Top News

एलटीसी प्रकरणात कारवाई साठी जिवती पोलीसात पोलिसात तक्रार दाखल #Jivati

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
जिवती:- पंचायत समितीच्या शिक्षण विभागात सन २०१९-२०२० मध्ये कार्यरत ५४२ शिक्षकांनी बोगस बिले सादर करून करून एलटीसी चा लाभ घेतलेला आहे. यात १३ लाख ६८ हजार ६४३ रुपयाचा शासकीय निधीचा उपहार झाला, असे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.

अहवालात रेल्वेचे तिकीट बनावट असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, यासाठी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे वरिष्ठाकडे तक्रार केली आहे. पण अधिकारी या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर गुरुवारी या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.



पंचायत समिती जिवतीमधील ५४२ शिक्षकांनी बोगसगिरी करून 'एलटीसी' रकमेची उचल केली याकरिता आदर्शवादी शिक्षकांनी प्रवास, हॉटेलचे बनावट बिल सादर केले. अधिकाऱ्यानीसुद्धा कोणतीही शहानिशा न करता एलटीसी रक्कम मंजूर केली. या शिक्षण महाशयांनी देवाला देणगी देल्याचे बोगस बिल दिले. शिक्षकांची ही बनवाबनवी लेखापरिक्षण अहवालात उघड झाली आहे. यासंदर्भात लेखापरीक्षण अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली असता शिक्षकांनी बोगसगिरी चव्हाट्यावर आली.

विशेष म्हणजे, लेखापरिक्षण अहवालात रेल्वेचे तिकीट बनावट असल्याचा उल्लेख केला आहे, तसेच गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार व शासन निर्णय १० जून २०१५ नुसार रजा प्रवास धारकांच्या १८ वर्षांवरील अपत्यांना सदर रजा प्रवास सवलतीचा लाभ अनुज्ञेय नसताना अनेक शिक्षकांनी या सवलतीचा लाभ घेतला आहे, असे लेखापरीक्षण अहवालात नमूद केले आहे.

गंभीर प्रकरणात उचल केलेली रक्कम वसूलपात्र असल्याने संबंधित शिक्षकांकडून वसूल करण्यात यावे व शिक्षकांसह अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, दिलेल्या तक्रार अर्जाची तातडीने चौकशी करून ५४२ शिक्षकांनी बेकायदेशीर 'एलटीसी' लाभ घेतलेला शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणीही पोलीस तक्रारीत रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी केली आहे.


गुरुवारी जिवती पोलीस ठाण्यात एलटीसीधारक शिक्षिकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत या शिक्षकावर कायदेशीर कारवाई न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा रुग्णसेवक जिवन तोगरे यांनी दिला आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने