Top News

विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगावा:- डॉ. राजीव वेगीनवार #pombhurna


पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे सायन्स एज्युकेशन सोसायटी तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी माती परीक्षण व सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजीव वेगीनवार सर, डॉ. सुधीर हुंगे, प्रमुख पाहुणे म्हणून तालुका कृषी अधिकारी पोंभूर्णा श्री चंद्रकांत निमोड, डॉ.अनंत देशपांडे, डॉ. विनोद कुमार उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सायन्स एज्युकेशन सोसायटी तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयाचे हस्तलिखित वार्षिकांक प्रतिबिंब चे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे चंद्रकांत निमोड सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून माती परीक्षण व सेंद्रिय शेती यावर सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी केलं. सोबतच शेतीसाठी महाराष्ट्र सरकार कडून ज्या विशेष योजना राबविल्या जातात त्यांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

डॉ.वेगीनवार सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीर हुंगे सर यांनी आपल्या मनोगतामध्ये एनपीके खते व ऑरगॅनिक कार्बन याबद्दल खूप महत्वाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोदकुमार सर यांनी केले. त्याचप्रमाणे सायन्स एज्युकेशन सोसायटीचे उद्देश व महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे संचालन कु. ईशा रामटेके हिने केले तर आभार कु. दिव्या कस्तुरे हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने