शिवशाही युवा मंच, वेळवा द्वारे भव्य रक्तदान शिबीर संपन्न #pombhurna

Bhairav Diwase
एकूण 23 रक्तदात्यांनी केले रक्तदान
पोंभूर्णा:- तालूक्यातील वेळवा गावात छत्रपती शिवाजी महाराज तथा वैराग्य मुर्ती संत गाडगेबाबा यांच्या संयुक्त जयंती चे औचित्य साधून दिनांक 27-02-2022 ला वेळवा गावात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन शिवशाही युवा मंचा द्वारे करण्यात आले.
विचार आणी कृती या तत्त्वावर चालत मागील काही वर्षापासून शिवशाही युवा मंचा द्वारे वेळवा गावात अनेक उपक्रम राबवले जात आहे. त्या दृष्टीने या ही वर्षी रक्तदान शिबीर गावात ठेवण्याचा निर्णय शिवशाही युवा मंच तथा गावातील युवकांनी घेतला. योग्य नियोजन आणी एकजुटीने कार्य करून गावात रक्तदान शिबीर संपन्न करण्याचे कार्य येथील युवकांनी केले.
खेडे गाव म्हटलं की शेतीचे विविध असे कामे प्रत्येकाला असतात, तरी पण या शिबिराला शेतातून येवुन तब्बल 23 रक्तदात्यांनी रक्तदान करत समाजापुढे एक अनोखा उदाहरण निर्माण करण्याचं काम येथील युवकांनी करून दाखवले.
रक्तदान शिबिराला मुन्ना लोणारे, नितीन नरसपुरे, समीर लोणारे, सुनिल कावटवार, रामेश्वर सोनटक्के, नयन मोरे, प्रशांत कावटवार , अजय रोहनकार, अनील मडावी, प्रशांत नरसपुरे, समीर लोणारे, रविंद्र ऊमक, अतूल जाधव, विवेक ईटेकार, पंकज वडेट्टीवार, प्रणय राऊत, प्रद्युम्न राऊत, संतोष बोदलवार, गोकुळदास केमेकार, वैभव जाधव, पंकज भोयर, हर्षद लोणारे, रविंद्र कावटवार, प्रविण कावटवार, शुभम बोदलकर आणि गंगाधर जाधव यांनी कार्यक्रम सुरळीत पणे पार पाडण्यासाठी मोलाची भुमीका पार पाडली.