💻

💻

जि. प. सभापती सुनिल उरकुडे यांचा वाढदिवस अनेक समाजकार्य करून साजरा.#socialwork

सभापती सुनिल उरकुडे यांच्या वाढदिवसाचा युवकांमध्ये क्रेझ.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दि. ०४/०२/२०२२ ला जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने अनेक समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये नोकारी ( खु) येथील विधवा व अपंग निराधारांना वॉटर कॅन वाटप करण्यात आले. तसेच चुनाला येथील गोशाळाला भेट देऊन गोमातेचे पूजन केले व नैवेद्य अर्पण करून अनाथ आश्रमातील मुलांसोबत केक कापून तसेच स्नेहभोजनसह वाढदिवस साजरा करण्यात आला. गोवरी येथील रोजगार हमि या योजने करिता गावातील महिलांनी पुढाकार दाखविल्याबद्दल त्यांना प्रोत्साहन म्हणून कामात येणारे साहित्य जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांच्या तर्फे साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच विधवा व अपंग निराधारांना वॉटर कॅन वाटप करण्यात आले.
जी. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनिल उरकुडे यांच्या वाढदिवसाचा क्रेझ असंख्य युवकांमध्ये, इस्ट मित्रांमध्ये दिसून आला. राजुरा तालुक्यातील असंख्य गावामध्ये सभापती उरकुडे यांचा वाढदिवस केक कापून व समाजकार्य करून साजरा झाला. तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषद, सहकारी मित्र तसेच आप्तजनांनी भेट देऊन, केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला.#socialwork

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत