Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

मच्छरांच्या वाढत्या समस्येवर आळा घाला; मुख्याधिकारी बल्लारपूर यांना निवेदन #ballarpur

बल्लारपूर:- बल्लारपूर शहरातील अनेक वार्डात लोकवस्ती नाल्याच्या अगदी जवळ किंवा झुडपी परिसराजवळ आहे तसेच शहरात झोपडपट्टी सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि या क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे.
मच्छरांमुळे डेंग्यू, मलेरिया यासारखे अनेक रोगराई पसरू शकतात आधीच मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे आणि त्यातच पुन्हा जर अशी रोगराई पसरली तर त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेलाच सहन करावा लागणार आहे यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावे असे निवेदन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी बल्लारपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. विजय सरनाईक यांना दिले व या विषयाचे गांभीर्य समजावून सांगितले असता मुख्याधिकारी साहेबांनी लवकरच यावर उपाययोजना करू असे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत