Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

भद्रावती पोलिसांकडून केंद्रीय विद्यालयात जनजागृती #bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती

भद्रावती:- सायबर सुरक्षा सप्ताहाअंतर्गत येथील पोलिस स्टेशनच्या वतीने दि. ५ मार्च रोजी चांदा आयुध निर्माणीतील केंद्रीय विद्यालयात महिला व मुलींबाबत  सायबर गुन्हे संबंधाने जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. 

       या कार्यक्रमाला १०० ते १२५ विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच  शिक्षिका उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांना चंद्रपूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी  यांनी मार्गदर्शन केले.

      यावेळी सायबर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप एकाडे (पाटील), भद्रावती पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती, सहाय्यक पोलिस निरीक्षक मुळे, सायबर सेलचे परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक रोशन इरचापे, गिरीश मोहतुरे, किशोर मानकर, पो.शि.रामप्रसाद नैताम उपस्थित होते. 

      कार्यक्रमाचे संचालन पोलिस हवालदार मुजावर अली आणि पोलिस नायक संतोष पानघाटे यांनी केले. कार्यक्रमाला केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत