Top News

जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला आघाडीतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन #chandrapur.

चंद्रपूर:- ८ मार्च जागतीक जागतिक महिला दिनानिमीत्‍त नारीशक्‍तीला सलाम करण्‍यासाठी भाजपा महिला आघाडी चंद्रपूर जिल्‍हा शाखेतर्फे जिल्‍हाभर विविध कार्यक्रम राबविण्‍यात येणार आहे.
जागतीक महिला दिनानिमीत्‍त मॅराथॉन दौड स्‍पर्धा, सायकल मॅराथॉन, सांस्‍कृतीक कार्यक्रम, गुणवंत महिलांचा सन्‍मान, महिलांसाठी आनंद मेळावा, महिलांचा पक्ष प्रवेश, महिला मेळावे, गरजू महिलांना मदत असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले असून त्‍या माध्‍यमातुन महिलांचा गौरव व त्‍यांच्‍यातील सुप्‍त गुणांना चालना देण्‍याचा प्रयत्‍न करण्‍यात येणार आहे.
या कार्यक्रमात महिलांनी मोठया संख्‍येने सहभागी होण्‍याचे आवाहन भाजपा महिला आघाडी जिल्‍हाध्‍यक्षा अल्‍का आत्राम, महामंत्री वंदना अगरकाठे, महामंत्री विजयालक्ष्‍मी डोहे, सायरा शेख आदी भाजपा महिला आघाडी पदाधिका-यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने