Top News

शिवजन्मोत्सव व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे आयोजित बक्षीस वितरण सोहळा यशस्वी रित्या संपन्न #chandrapur


चंद्रपूर:- शिवजयंती व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन बक्षीस वितरण सोहळा व सामाजिक क्षेत्रातील महिला वर्ग यांचा सन्मान कार्यक्रम दिनांक १३ मार्च रोजी संताजी सभागृह मूल रोड येथे यंग थिंकर्स चंद्रपुर तर्फे आयोजित करण्यात आला.
शिवजन्मोत्सव निमित्त्य दिनांक १५ ते १९ फेब्रूवारी दरम्यान टीम तर्फे विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.यामधे सर्व सहभागी स्पर्धक यांना प्रोत्साहन प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्याकरिता ह्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सोबतच जागतिक महिला दिनानिमित्त्य सामाजिक क्षेत्रातील महिला वर्ग यांचा विशेष सामाजिक कार्यासाठी त्यांना सन्मानपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणुन ब्रिजभूषणजी पाझारे उत्कृष्ट सभापती पुरस्कृत माजी सभापती तथा वर्तमान सदस्य जिल्हापरिषद चंद्रपुर आणि प्रमुख वक्ता म्हणुन संध्या काळे मैडम पोलीस विभाग कर्मचारी उपस्थित होते.सोबतच विशेष अतिथी म्हणुन राजेशजी साखरकर मुख्याध्यापक स्व.बापुजी वानखेडे विद्यालय चंद्रपुर,विशालजी निंबाळकर नगरसेवक मनपा चंद्रपुर व उमेशजी आष्टनकर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना सन्मानचिन्ह व सर्व सहभागी स्पर्धक यांना व महिलावर्ग यांना सन्मानपत्र देऊन गौरविन्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज,राजमाता जिजाऊ व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून, दिप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशिकांत आष्टनकर यांनी केले.मान्यवरांनी सर्वांना सखोल मार्गदर्शन केले.बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन शंकर वांढरे यांनी केले,आभार प्रदर्शन अनुप्रिया धारने यांनी केले व संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन वैष्णवी राऊत यांनी केले.या कार्यक्रमाला युवा विद्यार्थी वर्ग व पालक वर्ग आणि नागरिक उपस्थित होते.याप्रसंगी यशस्वी आयोजन समितीमधे रोशनी नगपुरे,मोहिनी चावले,वैष्णवी त्रीपाठी,ऋतुजा वानखेडे,आकाश वानखेडे,कौस्तुभ खंडाईत,उमेश गहुकर,तरुण वाढई,शुभम निंबाळकर व सम्पुर्ण यंग थिंकर्स चंद्रपुर टीम उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने