Top News

पोलिस स्टेशन टेकामांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर संपन्न #Jivati

जिवती:- पोलिस स्टेशन टेकामांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोगनिदान शिबीर या स्तुत्य उपक्रमचे आयोजन १६ मार्च जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा टेकामांडवा येथे करण्यात आले होते.


चंद्रपूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अरविंद साळवे तसेच अप्पर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या रोगाचे निदान व्हावे. त्यानां वेळीच उपचार मिळावा तसेच स्त्रिया व बालकांच्या आरोग्याची काळजी घेता यावी. सामान्य जनतेला योग्य उपचार मिळाल्यास त्यांचे आरोग्य सुद्दढ राहील व त्यांना योग्य निरोगी जीवमान जगण्यास मदत होईल या उदात्त हेतूने मोफत रोगनिदान शिबीर वैद्यकीय अधिकार्‍यांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आले होतो  
 सदर शिबिराचा लाभ परिसरातील जास्तीत जास्त जनतेने घेतला आहे, शिबिर यस्वशी करण्यासाठी पोलिस स्टेशन टेकामांडवा चे ठाणेदार रवींद्र म्हैसकर पोलीस कान्स्टेबल अजित देशकर ,रुपेश टोंगे, सुनिल राठोड , राकेश मुंढे व इतर पोलीस कर्मचारी व लहू राठोड, रुग्णसेवक जिवन तोगरे तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी परीसम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने