Top News

सोबत जगता येत नव्हतं म्हणून एकत्र मरण्याचा घेतला निर्णय; पण नियतीने..... #Death

यवतमाळ:- यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका प्रेमीयुगुलाच्या प्रेम प्रकरणाचा भयानक शेवट झाला आहे. या प्रेमीयुगलाची जात वेगवेगळी असल्याने समाज आणि नातेवाईक प्रेमविवाहाला संमती देणार नाहीत आणि एकमेकांशिवाय जगताही येणार नाही म्हणून त्यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. मात्र नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. या प्रकरणात प्रियकराचा मृत्यू झाला आहे तर प्रेयसी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
कपिल बावणे असे आत्महत्या करणाऱ्या 25 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो यवतमाळ जिल्ह्यातील कळंबनजीक असणाऱ्या मावळणी गावातील रहिवासी होता. त्याचे याच गावातील एका मुलीसोबत प्रेमसंबंध सुरू होते. पण समाज प्रेमाला मान्यता देत नाही. तसेच दोघांची जातही वेगळी असल्याने लग्नात अनेक अडथळे येणार होते. दोघांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती आणि समजापुढे त्यांना काहीच करता येत नव्हतं. यामुळे त्यांनी एकत्र जगता येत नसेल तर एकत्र मरू असा विचार करून एकत्र आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
यानंतर या दोघांनी गावाजवळच्या एका शेतात जाऊन विष प्राशन केले. या घटनेची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी दोघांनाही कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ याठिकाणी उपचारासाठी हलवण्यात आले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. रुग्णालयात जात असताना वाटेतच प्रियकर कपिलने अखेरचा श्वास घेतला. तर प्रेयसीची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. तिचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या तरुणीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करत आहेत.
तसेच संबंधित तरुणीचं आठ दिवसांपूर्वीच धुळ्यातील एका तरुणासोबत लग्न ठरलं होतं. याच कारणातून दोघांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने