Top News

प. पु. संत शिरोमणी लहरी बाबा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त पादुका पूजन सोहळा संपन्न #Rajura

अनेक भाविक भक्तांनी घेतला पादुका दर्शनाचा लाभ
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- राजुरा शहरात प्रथमच प. पु. संत शिरोमणी लहरी बाबा जन्मशताब्दी वर्ष 2022 सोहळा निमित्य प. पु. सद्गुरु लहरीबाबा यांच्या पादुका पूजनाचा सोहळा दिनांक 13 मार्च रोज रविवारला नक्षत्र हॉल, चुनाळा रोड राजुरा येथे संपन्न झाला.

गोंदिया तालुक्यातील ग्राम कामठा येथील प.पू.संत शिरोमणी लहरी बाबा यांनी अध्यात्मिक क्षेत्रात तसेच आपले समाजातील अंधश्रद्धा अज्ञान व जुन्या सामाजिक रूढी परंपरा समाप्त करण्यासाठी, जनजागृती करण्यासाठी बहुमोल कार्य सुरू केले होते,यांच्या या कार्याचा उंच तुरा आजच्या या समाजातील प्रत्येक श्रीमंत व गरीब जनतेने आपल्या काळजात रोवावा याकरिता प.पू.संत लहरी बाबा जन्मशताब्दी निमित्याने पादुका पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
संत लहरीबाबा यांच्या पादुका पंढरपूरची वारी करत डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या या अप्रतिम सजावटीत भजनात,टाळ, मृदंगाच्या गजरात या पालखीचे आगमन झाले पादुका पूजनानंतर संत लहरी आश्रम ट्रस्ट कामठा चे डॉ.खिलेश्वरनाथ उर्फ तुकड्या बाबा यांनी सरळ,सोप्या व अत्यंत मार्मिक शब्दात मोलाचे मार्गदर्शन केले तसेच काही जवळपासच्या ग्रामीण भागातून आलेले त्यांचे सेवेकरी व भाविक तसेच राजुरा शहरातील तमाम जनतेला अंधश्रद्धा,रुढी परंपरेवर मात करून सामाजिक बांधिलकीची जोपासना होण्याकरीता "माणुसकीला जपा "असा मंत्र दिला.भजनांच्या माध्यमातून संपूर्ण भाविक सभागृहात मंत्रमुग्ध होऊन "जय लहरी जय मानव"चा नारा देत चित्ततल्लीन झाले तसेच प्रा.संजय दानव यांनी प.पू.संत लहरी बाबा जन्मशताब्दी महोत्सवाबद्दल वर्षभरात होणाऱ्या कार्यक्रमाला हजारो भाविक मोठ्या संख्येने या महोत्सवाचा लाभ घेतील या उद्देशाने कार्यक्रमाचा तपशील सर्व अनुयायी तथा भाविकांसमोर सादर केला
तसेच संत लहरी आश्रम कामठा येथे 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या या सुवर्णमयी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी असेही आवाहन त्यांनी केले  यावेळी काही मान्यवरांचे अनुभवकथन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड संजय धोटे लहरी आश्रम कामठाचे ट्रस्टी यांनी केले. महाआरती डॉ. अर्पित धोटे सह संपूर्ण धोटे कुटूंबियांनी अर्पण केली. महाआरती झाल्यावर सर्व भाविक जनतेनी संत लहरी बाबांच्या पादुकांचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला.
यावेळी उपस्थित ॲड अनिल ठाकरे कायदेशीर सल्लागार श्री लहरी आश्रम कामठा जि.गोंदिया,प्रा.संजय दानव पावर बँक,बालाघाट येथील तुलसीजी तसेच गुणवंत जाधव नागपूर आकाशवाणी रेडिओ स्टेशन,तथा संपूर्ण भजनी मंडळ तसेच लहरी सेवा समिती चंद्रपूर,लहरी युवा मंच चंद्रपूर यांचे हा कार्यक्रम यशस्वी होण्यामागे विशेष मार्गदर्शन लाभले यावेळी उपस्थित मान्यवर सुधीर धोटे, सतिश धोटे, ॲड संजय धोटे यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने