जाहिरात... Advertisement... विज्ञापन

नारंडा येथे इयत्ता दहा १० च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ साजरा #Korpana

सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा चे बक्षीस वितरण
कोरपना:- कोरपना तालुक्यातील आदर्श किसान विद्यालय नारंडा येथे निरोप समारंभ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक गुरूमुखी सर, भिमनवार सर, गोरे सर, मोडकवार सर, फुलझेले सर, खामकर सर, धुमाने सर, निवलकर मॅडम, वाभिटकर सर, भारतीय वार्ता न्यूज कोरपना तालुका प्रतिनिधी मंगेश तिखट, अरुण निरे, सर्वांचे पुष्प गुच देऊन स्वागत करण्यात आले. सर्व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले, १० वर्गातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
मिनल जुमनाके, मानसी गाडगे, आकांशा झाडे, दिव्या वांढरे, कुणाल मोहूर्ले, समीक्षा बोरुले, अंकिता ताजने, या सर्व विद्यार्थ्यांनी आप मनोगत केले, कार्यक्रमाच्या रूपरेषा संचालक मनस्वी कोडापे या विद्यार्थिनीनि, संचालन केले, व सामान्य ज्ञान व निबंध स्पर्धा आयोजित केली होती, त्या मध्ये प्रथम क्रमांक कुणाल मोहुर्ले, द्वितीय क्रमांक, संध्या बोरूले, तृतीय क्रमांक तनु करमानकर, या सर्व विद्यार्थ्यांनी क्रमांक पटकावला आहे, प्रथम बक्षीस ,१००० रुपये श्री माननीय शरद जी जोगी यांच्या कडून देण्यात आले.
द्वितीय बक्षीस ,७०० रुपये श्री भारतीय वार्ता चैनल कडून देण्यात आले, तृतीया बक्षीस ५०० रुपये श्री माननीय. आबिद अली साहेब यांच्याकडून देण्यात आले या प्रकारे निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत