जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णाची शैक्षणिक सहल #pombhurna #chandrapurपोंभुर्णा:- चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा ची शैक्षणिक सहल दिनांक 7 मार्च रोज सोमवारला चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथील इतिहास विभागाच्या वतिने विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. उगेमुगे यांच्या नेतृत्वात करण्यात आले. सहाय्यक प्रा. घोडेस्वार सर आणि डॉ. नरवाडे मॅडम ह्या होत्या. कोरोना-19 या महामारीमुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाइन शैक्षणिक शिक्षण सुरु होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उदासीन वातावरण निर्माण झाले होते. या विद्यार्थ्यांमध्ये नवचेतना निर्माण व्हावी तसेच त्यांच्यात आनंदाचे व खेळीमेळीचे वातावरण निर्माण व्हावे. यासाठी या सहलीचे आयोजन करण्यात आले.
शैक्षणिक सहल पोंभूर्णा येथून भद्रावती येथील प्राचीन पार्श्वनाथ मंदिर, भद्रनाग मंदिर, बौद्ध लेण्या, पोहणा येथील रुद्रेश्वर मंदिर व डोमा घाट या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्यात आले. त्यानंतर आजनसरा येथील भोजाजी महाराज या मोठ्या देवस्थानाला भेट देण्यात आली. तिथूनच भोजनाचा कार्यक्रम आटोपून ही सहल परत फिरली. या सहलीमध्ये अनेक ऐतिहासिक प्रेक्षणीय स्थळांना भेटी दिल्या, तसेच मंदिरांना भेटी दिल्या आहेत त्याविषयीची ऐतिहासिक माहिती विद्यार्थ्यांना प्रा.उगेमुगे इतिहास विभाग प्रमुख यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्राचीन स्थळाविषयी आवड, इतिहास जाणून घेण्याविषयी उत्सुकता निर्माण झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत