जाहिरात... Advertisement... विज्ञापन

आ. सुधीरभाऊ च्या प्रेरणेने गरजू लोकांची सेवा करण्याची संधी:- अल्का आत्राम #pombhurna

सभापती अल्का आत्राम यांनी दिव्यांगाला गाय भेट देवून साजरा केला अनोखा वाढदिवस
पोंभूर्णा:- दिनांक १२ मार्च २०२२ ला पंचायत समिती सभापती अल्का आत्राम यांचा वाढदिवस येतो. हा दिवस अल्का आत्राम विविध कार्यक्रमांनी साजरा करीत असतात. आपल्या वाढदिवसानिमित्त तसेच आदिवासी क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांच्या जयंती निमित्ताने देवई येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळा येथील मुलांना भोजन, बुक वाटप, जामखुर्द येथील दिव्यांग भुजंग मडावी जो १८ वर्षाचा असून सुध्दा तो फक्त दूध पितो, अन्नाचा कणही खात नाही, त्याला नेहमीच लोक मदत करत असतात पण कायमची व्यवस्था व्हावी म्हणून त्याला दूध देणारी गाय भेट म्हणून देण्यात आली.

हेही वाचा:- जन्मापासून फक्त दुधावरच जगतोय सतरा वर्षांचा "भुजंग"


तसेच गडचांदूर येथे विजयालक्ष्मी डोहे यांचे वतीने ई-श्रमिक कार्डचे वितरण करण्यात आले. केमारा, भिमणी येथे नोटबुक वितरण करण्यात आले तसेच विविध ठिकाणी क्रांतीविर बाबुरावजी शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बरेच कार्यकर्ते उपस्थिती होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत