Top News

जि.प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे शालेय बालपंचायत स्थापन #pombhurna

निवडणुक प्रक्रियेच्या माध्यमातुन बालपंचायत स्थापन

निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मोबाईल ईव्हीएम चा वापर
पोंभुर्णा:-
मॅजिक बस इंडिया फाउंडेशन चंद्रपूरच्या सहकार्याने शालेय मुलांना देशातील निवडणूक पध्दतीची माहिती व्हावी या उद्देशाने तसेच मतदान जनजागृतीसाठी शालेय बालपंचायत निवडणूक घेण्यात आली. मॅजिक बस इंडिया फाउंडेशनचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे तसेच तालुक्याचे क्लस्टर मॅनेजर हिराचंद रोहनकर यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक १६ मार्च २०२२ रोजी जि. प. उच्च प्राथमिक शाळा उमरी पोतदार येथे निवडणुक पध्दतीने शालेय बालपंचायत स्थापन करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेत प्रामुख्याने उमेदवारी अर्ज भरणे, माघार घेणे, प्रचार करणे, प्रत्यक्ष मोबाईल ईव्हीएम चा मतदान करण्यासाठी वापर या प्रक्रियेच्या माध्यमातुन शालेय बालपंचायत निवडणुक पार पडली.

शालेय बालपंचायत निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्याध्यापक अनिरुद्ध कदम, सुशिल गव्हारे, अरुण कोवे, मधुसूधन टोंगे, सुरेश कावरे तसेच शाळेतील शिक्षक इतर कर्मचारी उपस्थित राहुन हि प्रक्रिया यशस्वीरित्या पुर्ण केली.

यावेळी शाळा सहाय्यक अधिकारी बजरंग वक्टे, समुदाय समन्वयक शिवानी शेंडे, निखिल देशमुख, विजय ढोले, चांदणी निमसरकर, रुपेश मडावी यांच्या सहकार्याने निवडणुक प्रक्रिया पार पडली.
निवडणुक प्रक्रियेनंतर निकाल जाहिर करण्यात आला. निवडुन आलेल्या उमेदवार विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी अतिशय शांतता ठेऊन तसेच कोरोना नियमांचे पालन करुन बालपंचायत निवडणूक यशस्वीरीत्या पार पडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने