Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

महिला शक्ती ग्रामसंघाच्या वतीने राणी हिराई घरकुल मार्ट चे उद्घाटन #sindewahi

उमेद अभियानाची शाश्वत विकासाकडे वाटचाल

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, प.स.सिंदेवाही अंतर्गत नवरगाव-पळसगावं जाट प्रभागात पळसगावं जाट येथे राणी हिराई घरकुल मार्ट चे उद्घाटन मा.श्री.संजयजी पुरी साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती सिंदेवाही यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.जगदीशभाऊ कामडी सरपंच ग्रामपंचायत, पळसगावं जाट हे होते. प्रमुख पाहुणे श्री.कांबळे साहेब घरकुल नोडल अधिकारी तथा कृषी विस्तार अधिकारी प.स.सिंदेवाही,श्री.संतोषजी गायकवाड ग्रा.प. उपसरपंच ,श्री.सुभाषजी कोलते पोलीस पाटील ,सौ. प्रियंकाताई अलमस्त ग्रा.प.सदस्य,श्री.सचिन शहारे ग्रा.प. सदस्य,श्री.रमेश बनकर ग्रा.प.सदस्य ,सौ.सीमाताई गणवीर संघर्ष प्रभागसंघ अध्यक्ष,सौ.दीपालीताई शंभरकर ग्रामसंघ सचिव यांच्या उपस्थित पार पडला गेला.
घरकुल मार्ट ही संकल्पना मुख्यकार्यकारी अधिकारी मा.श्रीमती मिताली शेट्टी जी.प.चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून निर्माण झाली आहे. महिला बचत गट व ग्रामसंघातील महिला आर्थिक सक्षम व्हावे व ग्रामसंघाचे स्वतंत्र व्यवसाय निर्माण व्हावे करिता उपक्रम राबवण्यात येत आहे.गावात वर्षाला घरकुल योजना, इंदीरा आवास योजना, शबरी योजना,रमाई योजना, यशवंतराव चौहान योजना इ.योजना गावात येत असतात.त्यासाठी लागणारे साहित्य, कच्चा माल,विटा, सिमेंट, लोहा, खिडकी, दरवाजे इ. लागणारे साहित्य खरेदी मोठया शहरातून केली जाते.तेच साहित्य जर घरकुल मार्ट च्या माध्यमातून जर गावातच उपलब्ध करून दिले तर वेळ व पैसे वाचेल व गावातील पैसे हा गावातच राहील त्यामुळे महिलांना रोजगार मिळेल व ग्रामसंघाचे आर्थिक उत्पन्न वाढेल हाच उद्देश समोर ठेऊन घरकुल मार्टचे सुरुवात आज केली गेली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.विवेक नागरे तालुका अभियान व्यवस्थापक यांनी केले.कार्यक्रमाचे येसस्वितेकरिता श्री.उद्धव मडावी तालुका व्यवस्थापक, श्री.ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समनव्यक, श्री.स्वप्नील गिरडकर स्किल समनव्यक, श्री.मयुर खोब्रागडे पशु व्यवस्थापक, सौ.शालिनी गभने, माधुरी पेंद्रे,किरण डेरे, ज्योती शहरे यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत