जाहिरात... Advertisement... विज्ञापन

तरुणाने विष प्राशन करून स्वतःला संपवले #suicide

गोंडपीपरी:- तालुक्यातील नांदगाव येथील २८ वर्षीय तरुण विष प्राशन करून स्वतःला संपविल्याची दुदैवी घटना गोंडपीपरी तालुक्यातील नांदगाव फुर्डी येथे आज दि.११ शुक्रवारी सकाळी घडकीस आली.
मृतकाचे नाव संतोष मुरलीधर पिपळशेंडे रा. नांदगाव असे आहे.
प्राप्त माहितीनुसार काल संतोषने सॉरी असा स्टेटस मोबाईल ला ठेवला होता असल्याची चर्चा आहे त्यामुळे प्रेमात भंग झाल्याने हे कठोर पाऊल उचलले असावे असा अंदाज नागरिकांकडून वर्तवल्या जात आहे..त्याची आई गावात असणाऱ्या मुलीकडे झोपायला गेल्या होत्या घटनेच्या वेळी वडील शेतात जागणीला गेले होते.घरी कुणी नसल्याची संधी साधत संतोषने विष प्राशन करून स्वतःला संपविल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे पिंपळशेंडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी गोंडपीपरी पोलीस स्टेशन चे कर्मचारी गौरकार,चव्हाण,कोवे पोहचून मर्ग दाखल करण्यात आला असून म्रुतकाचे शव उत्तरणीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय गोंडपीपरी येथे पाठविण्यात आले पुढील तपास ठाणेदार राजगुरू यांच्या मार्गर्शनात गोंडपीपरी पोलीस करीत आहे.
सौजन्य WWW.IMPACT24NEWS.COM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत