जवानांवर हल्ला करण्याचा माओवाद्यांचा कट उधळला #attack

Bhairav Diwase
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या बिजापुर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या माओवाद्यांच्या विरोधात बासागुडा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त मोहीमेत बासागुडा ते सरकेगुडा, दरम्यान रस्ता उघडण्याच्या कर्तव्यावर बाहेर पडले होते.
अभियान राबवून परतत असताना कोट्टागुडा वस्तीपासून 400 मीटर अंतरावर नाल्याजवळील दोन झाडांच्या मध्यभागी माओवाद्यांनी जवानांना लक्ष्य करण्यासाठी IED प्लांट लावला होता. सुरक्षा दलांना लक्ष्य करत माओवाद्यांनी नाल्याच्या काठावर असलेल्या झाडांच्या सावलीत दोन्ही झाडांच्या मधोमध आयईडी पेरला होता.
परंतू जवानांच्या सतर्कतेने जवानांना नाल्याच्या बाजूला एक तार दिसल्यानंतर बाॅम्ब शोधक पथकाला पाचारण करण्यात आले बाॅम्ब शोधक पथकाने माओवाद्यांनी पेरलेला आयईडी तिथेच स्फोट करुन निकामी केल्याने माओवाद्यांचा मोठा कट उधळला गेला.