गडचांदूर येथे भव्य आरोग्य मेळावा #gadchandur

कोरपना:- कोरपना तालुक्यातील जनतेला तज्ज्ञ डॉक्टरांची वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आझादी का अमृत महोत्सव निमित्ताने ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे 24 एप्रिल ला सकाळी 9 वाजता भव्य आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहेत.
या आरोग्य शिबिरात फिजिशियन, शल्य चिकित्सक, बालरोग तज्ञ,स्त्री रोग तज्ञ,नेत्र रोग तज्ञ,दंत चिकित्सक, नाक,कान, घसा तज्ञ,आयुष व युनानी वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध प्रकारच्या रोगाची तपासणी करून निदान केले जाणार आहेत. या शिबिरात रुग्णांना गोल्डन कार्ड देण्यात येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या