Top News

विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर जागृत राहावे:- संजय रामगिरीवार #pombhurna

विद्यापीठ पदवी वितरण समारंभ संपन्न
पोंभुर्णा:- आज दिनांक 11 एप्रिल 2022 ला चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे 9 वा पदवी वितरण समारंभ साजरा करण्यात आला. समारंभाला जिल्हा वार्ताहर व सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संजय रामगिरीवार हे उद्घाटक म्हणून हजर होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. वेगिनवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. एन. एच. पठाण प्राचार्य, चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा, डॉ. परमानंद बावनकुळे सिनेट सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. संघपाल नारनवरे, प्रभारी प्राचार्य, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभुर्णा, डॉ सुधीर हुंगे आणि चिंतामणी सायन्स कॉलेज चे IQAC संचालक डॉ. अनंत देशपांडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने तसेच विद्यापीठ गीताने झाली. डॉ. देशपांडे सर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले. श्री.रामगिरवार सर यांचे शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांनी विद्यार्थ्यांना दिक्षा आणि दिक्षांत, शिक्षण आणि विवेक अधिकार आणि कर्तव्य यातील दुवे समजावत पदवी आणि शिक्षणाचे महत्व सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर जागृत राहावे असेही संजय रामगिरीवार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ बावनकुळे सर, डॉ पठाण सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मान्यवरांच्या हस्ते एकूण 14 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान कऱण्यात आल्यात. डॉ वेगिनवार सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. वैशाली मुरकुटे यांनी केले तर आभार डॉ. मेघा कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी महाविद्यालयाचा प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे योगदान लाभले. तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रागीताने झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने