विरुर स्टेशन येथे मोकाट कुत्र्यांची दहशत #chandrapur #rajura #dog

Bhairav Diwase
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत विरूर स्टेशन येथे आज मोकाट कुत्र्यांची दहशत निर्माण झाली असून दोन मुलावरती हल्ला करुन जखमी केले. व दहा ते बारा लोकावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला व जखमी केले.
नागरिकांमध्ये मोकाट कुत्र्या पासून फार भीती निर्माण झाली आहे. जखमी झालेले 2 मुले व इत्तर नागरिकांना उपचार करिता चिंचोली प्राथमिक रुग्णालय येथे नेण्यात आले आहे. ग्रामवासिया मध्ये भीतीची वातावरण निर्माण झाले असून ग्राम पंचायतनी पशू संवर्धन विकास अधिकारी यांना माहिती देऊन ताबतोब मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावे अशी गावकऱ्यांची मागणी केली आहे.