संघर्ष प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा संपन्न #sindewahi

Bhairav Diwase
उमेद MSRL प. स. सिंदेवाही तर्फे आयोजित

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत संघर्ष प्रभागसंघ प्रभाग नवरगाव-पळसगावं जाट प्रभागसंघ वार्षिक अधिवेशन सोहळा पार पाडला गेला सादर कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाष कोलते पोलीस पाटील पळसगाव जाट, उद्घाटक सौ.निलीमाताई कोवले अध्यक्ष भरारी प्रभागसंघ , प्रमुख अतिथी श्री.महले साहेब तालुका कृषी अधिकारी सिंदेवाही,श्री.खोंड साहेब बँक मॅनेजर बँक ऑफ इंडिया ,श्री.उद्धवजी मडावी तालुका व्यवस्थापक (उमेद), सौ.कुंदाताई अलोने अध्यक्ष झेप महिला प्रभागसंघ , सौ.सीमाताई गणवीर अध्यक्ष संघर्ष प्रभाग संघ ,सौ.कविता अगडे सचिव संघर्ष प्रभागसंघ , सौ.लीला आंनदे कोशाध्यक्ष संघर्ष प्रभागसंघ,श्री.रमेश बनकर ग्रामपंचायत सदस्य ,सौ.लोखंडे ताई ग्रामपंचायत सदस्य, नवरगावं, श्री.ज्ञानेश्वर मलेवार प्रभाग समनव्यक (उमेद), कु.सविता उईके प्रभाग समनव्यक (उमेद ),श्री.आशिष दरडे प्रभाग समनव्यक (उमेद), श्री.स्वप्निल गिरडकर स्किल समनव्यक (उमेद) कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.कविता अगडे प्रभागसंघ सचिव यांनी केले.
सत्कार सोहळात उत्कृष्ट ग्रामसंघ व स्वयंम सहायता समुहाला प्रथम पुरस्कार माऊली महिला ग्रामसंघ, देलनवाडी, द्वितिय पुरस्कार आशा महिला ग्रामसंघ डोंगरगाव सलोड तसेच प्रथम पुरस्कार साई स्वयंम सहायता समूह, पळसगावं द्वितिय पुरस्कार दुर्गा स्वयंम सहायता समूह, चारगाव यांना यांना शिल्ड,प्रमाणपत्र व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.आर्थिक वर्षात ज्या बँक नी उत्कृष्ट काम केले त्यांच्या बँक मॅनेजर साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सौ.अश्विनी कुंभम यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती रजनी गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेकरिता श्री.सचिन लोधे (Cam),श्री.मयुर खोब्रागडे (Clm),श्री.हर्षद रामटेके (Clm),श्री.प्रभाकर मानकर (Cfm) व प्रभागातील सर्व कॅडर यांनी सहकार्य केले.