नारंडा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी #korpana

Bhairav Diwase

अहिल्यादेवींचे विचार आचरणात आणणे हीच खरी आदरांजली:- आशिष ताजने

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- तालुक्यातील मौजा नारंडा येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती साजरी करण्यात आली.यावेळी नारंडा येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची पूजा व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून कैलाश उराडे, उदघाटन म्हणून नारंडा ग्रामपंचायच्या सरपंच अनुताई ताजने,भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,धनगर समाज संघर्ष समितीचे अध्यक्ष संदीप शेरकी,दवंडे सर,खाडे सर,उपसरपंच बाळा पावडे,नारंडा ग्रामपंचायतचे माजी सरपंच वसंतराव ताजने,महादेव पाटील खाडे, तुळशीराम भोंगळे, सदाशिव पोटदुखे,पोलीस पाटील नरेश परसुटकर,जेष्ठ शिक्षक पावडे गुरुजी,ग्रामपंचायत सदस्य रुपाली उरकुडे,रंजना शेंडे,वर्षा उपासे ,ऋषी गाडगे,पांडुरंग गाडगे,प्रवीण हेपट,मारोती चामटे,तुळशीराम गाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
       
         धनगर समाजातील प्रत्येक नागरिकांनी अहिल्यादेवी यांच्या कार्यातून प्रेरणा घेतली पाहिजे तसेच समाजाच्या न्याय हक्कांसाठी लढत असताना प्रत्येक समाज बांधवानी खांद्याला खांदा लावून साथ देऊन संघर्ष केला तरच आपल्याला येणाऱ्या काळात यश प्राप्त होईल असे यावेळी कैलाश उराडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले,


         राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या उत्कृष्ट राज्यकर्त्या होत्या, तसेच त्यांनी दक्षिणेपासून उत्तरेपर्यत आपल्या साम्राज्याचा विस्तार केला,त्यांनी आपल्या राज्यात अनेक मंदिरे,नदीघाट,बंधारे,आश्रयशाळा बांधुन उत्तम प्रकारे राज्यकारभार कसा चालवू शकतो हे १७ व्या शतकात समाजातला दाखवून दिले,त्याच्या विचारांचा अंगिकार करून आपण आपल्या आचरणात आणू तेव्हाच त्यांना खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
     यावेळी संदीप शेरकी,दवंडे सर,खाडे सर,पोलीस पाटील नरेश परसुटकर,पावडे गुरुजी यांचीसुद्धा मार्गदर्शनपर भाषणे झाली.



    यावेळी धनगर समाजातील कार्यकर्ते अरुण निरे यांचे काही दिवसांपूर्वी दुःखद निधन झाले त्यांना यावेळी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.गावातील पुरुष, युवक वर्ग व महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती, 
कार्यक्रमाचे संचालन अरविंद खाडे व आभार प्रदर्शन सत्यवान चामाटे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विनोद काथवटे,सचिन दवंडे,अनिल निरे,चंद्रभान चामाटे,निखिल गाडगे, प्रफुल गाडगे,महेश गाडगे,अक्षय बोधे,विनोद उपासे,निखिल काथवटे, मयूर गाडगे,हर्षल चामाटे, राहुल खाडे, वैभव गाडगे,संकेत गाडगे, मयूर गाडगे यांनी अथक परिश्रम घेतले.