महिलांनी आपली सुरक्षा "विमा कवच" काढून करावी:- अल्का आत्राम
कसरगट्टा येथे सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरा
पोंभुर्णा:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला यशस्वी 8 वर्ष पूर्ण झाली. म्हणून भाजपा महिला आघाडी प्रदेशाकडून 2 जून ला पोंभूर्णा तालुक्यातील कसरगट्टा येथे सेवा, सुशासन व गरीब कल्याण पर्व साजरा करण्यात आला.
🎂
भाजपा महिला मोर्चा जिल्हा चंद्रपूरच्या वतीने महिलांना केंद्र सरकारच्या विविध योजना आणि केंद्र सरकारनी गोरगरीब लोकांसाठी आणलेल्या विमा योजना बद्दल माहिती आणि विमा काढणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
🎂
यावेळी वनिताताई कानडे प्रदेश उपाध्यक्ष, अल्का आत्राम जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी, सुलभा पिपरे नगराध्यक्ष नगर पंचायत पोंभूर्णा, लक्ष्मी सागर सोशल मीडिया प्रमुख, वर्षा पिपरे सरपंच, नंदा कोटरंगे सभापती, शारदा गुरनुले माजी नगरसेविका, मनीषा थेरे, सुनीता शेंडे, ओझेलवार ताई, मेश्राम ताई, पिपरे ताई आणि शासनाच्या विविध विमा योजनेची सविस्तर माहिती भीमराव चांदेकर सर यांनी दिली तसेच विमा काढण्यासाठी बँकेचे प्रतिनिधी आणि बहुसंख्येनी महिला उपस्थित होत्या. यावेळी देवराव धोडरे, श्रीकांत वडस्कर, नितीन धोडरे सर्व भाजपा चे कार्यकर्ते उपस्थित होते.