जाहिरात... Advertisement... विज्ञापन

अनु. जाती. विभागाच्या सिंदेवाही तालुकाध्यक्ष पदी पराग देवगडे (पुण्यनगरी वार्ताहर) यांची नियुक्ती #sindewahi

सिंदेवाही:- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अनु.जाती.विभाग)च्या अंतर्गत सिंदेवाही तालुकाध्यक्ष म्हणून पराग त्र्यंबक देवगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटच्या अध्यक्षा खा. सोनिया गांधी, खा. राहुल गांधी यांच्या प्रेरणेने नितीन राऊत राष्ट्रीय अध्यक्ष अनु. जाती. विभाग तसेच मनोज बागडी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी, विजय आंबोरे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश अनु. जाती. विभाग, यांच्या आदेशानुसार तसेच विजय वडेट्टीवार मंत्री, पालकमंत्री चंद्रपूर, बाळुभाऊ धानोरकर , आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वाखाली आपण अनुसूचित जाती विभागाचे काम सक्षमपणे कराल. अशी अपेक्षा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सिंदेवाही तालुक्यातील तळागाळातील समाज घटकांना दिलासा देण्याचे काम आपल्या कार्यकाळात सक्रियतेने व्हावेत अशी अपेक्षा तालुक्यातील जनतेनी व्यक्त करुन सर्वत्र अभिनंदन होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत