Top News

नगरपरिषद व नगरपंचायत आरक्षण सोडत 28 जुलै रोजी Municipal Council and Nagar Panchayat on July 28 to release reservation


आरक्षण सोडतीसाठी पीठासीन अधिकाऱ्यांची नियुक्ती
चंद्रपूर:- राज्य निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, वरोरा, राजुरा, मुल, चिमूर, घुग्गुस व नागभीड या नगर परिषदांमधील व भिसी नगर पंचायतीमधील सदस्य पदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांचे आरक्षण सोडत पद्धतीने निश्चित करावयाचे आहे.
त्याअनुषंगाने, नगरपरिषद व नगरपंचायतीचे आरक्षण सोडत गुरुवार, दि. 28 जुलै 2022 रोजी दुपारी 12 वाजता संबधित नगरपरिषद/नगरपंचायत कार्यालयात पार पडणार आहे. नगरपरिषद व नगरपंचायतीचे आरक्षण सोडत इत्यादीपासून अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यापर्यंतच्या कार्यवाही वर नियंत्रण ठेवण्यासाठी पिठासीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
यात बल्लारपूर न.प करीता उपविभागीय अधिकारी बल्लारपूर, वरोरा न.प. करीता उपविभागीय अधिकारी वरोरा, मुल न.प. करीता उपविभागीय अधिकारी मुल, राजुरा न.प. करीता उपविभागीय अधिकारी राजुरा, चिमूर न.प. करीता उपविभागीय अधिकारी चिमूर, नागभीड न.प. करीता उपविभागीय अधिकारी नागभीड  व घुगुस न.प. करीता उपविभागीय अधिकारी चंद्रपूर तर भिसी नगर पंचायतीकरिता उपविभागीय अधिकारी, गोंडपिपरी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
तरी, वरीलप्रमाणे आरक्षण निश्चित सोडतीच्यावेळी संबंधित नगर परिषद / नगर पंचायत क्षेत्रातील इच्छुक नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने