💻

💻

विवेक नगर वासियांसाठी अंजली घोटेकर यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर #Chandrapur #flood


चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या भोंगळ कारभारा मुळे विवेक नगर परिसरातील रस्त्यांवर पाणी साचल्याचा आरोप माजी महापौर अंजली घोटेकर यांनी केला.

माजी महापौर अंजली घोटेकर विवेक नगर वासियांसाठी धावून येत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. राष्ट्रीय महामार्गाच्या इंजिनियरला योग्य काम करा अन्यथा भर पावसात उपोषणाला बसण्याचा इशारा दिला.चंद्रपूर-मुल मार्गावरील मच्छीनाल्या जवळ केलेले बांधकाम योग्य नाही. निकृष्ठा दर्जाचे बांधकाम, आडवी-तिडवी नाली बांधण्यात आली. यामुळे पाणी योग्य रित्या वाहत नसल्याने डॉ.करमरकर ते डॉ. सोईतकर यांच्या दवाखान्यापर्यंत 3 फूट पाणी रस्त्यावर होते. त्यामुळे रुग्णांना दवाखान्यात जायला त्रास होत होता. या बांधकामाची योग्य चौकशी करावी अशी मागणी सौ. अंजली घोटेकर यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत