Top News

पोंभुर्णा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा #chandrapur #pombhurna


पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीची तहसीलदार यांना निवेदन

पोंभुर्णा:- कोरोना नंतर समाजाची स्थिती सावरण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पुरस्थितीमुळे आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी बियाणे खरेदी केले होते. मात्र पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील लागवड केलेली पिके हि वाहून गेली. त्यामुळे दुबारा पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. परंतु कर्जाचा पैसा हा शेतीत लावल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटात सरकाराने बाहेर काढवे अशी मागणी पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.
पोंभुर्णा तालुक्यात पावसाने झोडपले आहे. पोंभुर्णा तालुक्यात सलग आठ दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे (धान, कापूस व सोयाबीन) अतोनात नुकसान झाले आहे. अगोदरच शेतकरी कर्जबाजारी झाला असून चिंतेने हवालदिल झाला आहे. बियाणे, खते आणि औषधे खरेदीसाठी महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या खात्यात प्रति हेक्टर रुपये 70,000/- (सत्तर हजार रुपये) त्वरित जमा करावी अशी तहसीलदारांकडे कवडू कुंदावार तालुकाध्यक्ष पोंभुर्णा तालुका काँग्रेस कमिटी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी कवडूजी उं कुंदावार अध्यक्ष, सोमेश्वर कुंदोजवार सचिव, पंढरीनाथ ठेंगणे चिंतलधाबा, वांढरे चिंतलधाबा, रंजन सत्यवान कोडापे चकठाणेवासना कांग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने