Top News

रामपूर-गोवरी-साखरी-पोवणी-कवठाळा-सास्ती राज्य मार्गाची तातडीने दुरूस्ती करा.

संबंधीत कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची राजुरा भाजपाची मागणी


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- राजुरा तालुक्यातील रामपुर - गोवरी - साखरी - पोवणी - कवठाळा राज्य मार्गाचे शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी निधी अंतर्गत नुकतेच काम करण्यात आले होते. काम पुर्ण होवून अवघा काहीच कालावधी झाला असतांना रस्ता पुर्ण उखडलेला आहे. या मार्गावर अनेक गावे असून गावातील नागरिकांसोबतच वे.को.ली. कर्मचारीसुध्दा मोठ्या प्रमाणात या मार्गावरून नियमीत ये-जा करत असतात. मात्र रस्ता पुर्णता उखडला असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे.
 शासनाचा करोडो रूपयांचा निधी खर्चुन या रस्याताचे बांधकाम करण्यात आले. परंतू प्रशासनाचा निष्काळजीपणा व कंत्राटदाराची निकृष्टता यामुळे अवघ्या काहीत दिवसात रस्याुठचे तिनतेरा वाजले आहे. या मार्गावर रोज अपघाताची मालीका सुरू असून हे सर्व अपघात खड्डेमय व दबलेल्या रस्याहेमुळे होत आहे. सदर रस्ता बांधकाम करणाऱ्या कंत्राटदार व संबंधीत अभियंत्यावर कायदेशिर कारवाई होणे आवश्यक आहे. 
 
 करिता रामपूर - गोवरी - साखरी - पोवणी - कवठाळा राज्य मार्गाची तातडीने दुरूस्ती करण्यात येवून संबंधीत कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा आठवडाभरानंतर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, या आंदोलनास बांधकाम विभाग व संबंधीत कंत्राटदार जबाबदार राहील याची नोंद घेण्यात यावी. अस निवेदनात म्हटले आहे.
 
निवेदन देताना सचिन मो. शेंडे भाजयुमो तालुका अध्यक्ष, संदीप पारखी ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री, अरुण लोहबडे सास्ती अध्यक्ष भाजयुमो, दीपक झाडे ग्रा,प,सदस्य, युवा नेते, रत्नाकर पायपरे, संदीप गायकवाड, कैलास कार्लेकर, योगराज जरिले, संदीप मडावी, नितीन पावडे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने