देशाच्या महामहिम राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची भरघोस मतांनी निवड #chandrapur #Rajura


भाजपा राजुरा च्या वतीने माजी आमदार अँड. संजय धोटे यांचे नेतृत्वात आनंद उत्सव साजरा
राजुरा:- वाद्यांचा गजर,फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय जनता पार्टी राजुराच्या वतीने देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या नेतृत्वात व मान्यवरांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी व ढोल ताशांच्या गजरात पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करून जलोश करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे म्हणाले की,देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी भगिनीला संधी देऊन महिलांचा सन्मानच केला. त्याचबरोबर महामहिम द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करुन देशातील सर्वोच्चपदावर विराजमान केले. त्याबद्दल पंतप्रधान मा.मोदीजी तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो अशे याप्रसंगी बोलताना माजी आमदार अँड संजय धोटे यांनी म्हटले.

याप्रसंगी माजी सभापती सुनील उरकुडे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख,भाजपा नेते अरुण मस्की,भाजपा जिल्हा सचिव वाघुजी गेडाम,भाजपा महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष स्वाती देशपांडे,माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया,माजी नगरसेवक राजेंद्र डोहे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,महामंत्री प्रशांत घरोटे,भाजप जिल्हा कार्यकारणी सदस्य संजय उपगनलावार,भाजयुमो तालुका अध्यक्ष सचिन डोहे,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजपा नेते महादेव तपासे,प्रदीप देशपांडे,ग्रामपंचायत सदस्य दिपक झाडे,विनोद नरेदृवार,राहुल सूर्यवंशी,सचिन बैस,रमेश मेश्राम,प्रदीप बोबडे,नितीन बामरटकर,सुरेश कलपलीवार,श्रीनिवास कोपुला,कैलास कार्लेकर,पराग दातारकर,अरुण लोहबळे,संदीप मडावी,तुलाराम गेडाम,शंकर गेडाम,जलया पोचमआदी भाजपा पदाधिकारी व आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत