आकाश मस्के यांनी परीसरातील नागरीकांशी साधला संवाद
चंद्रपूर:- संपूर्ण जिल्ह्यात गत सहा-सात दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच चंद्रपूर येथील इरई धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडल्याने शहरातील काही भागात पाणी जमा झाले आहे. यातच राजीव गांधी नगर आझाद चौक तेथील अतिवृष्टी मुळे घर पडली. तेथील नागरिकांनी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांना संपर्क साधला. आकाश मस्के यांनी त्या परीसरातील नागरीकांशी संवाद साधून धीर दिला.
