सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल....
कोरपना:- आलेल्या संधीचा फायदा कोण कसा घेईल, हे सांगताच येत नाही. आता हेच बघा ना, संततधार पावसाने ओव्हरफ्लो झालेल्या धरणातून मासे पकडण्याची संधी अनेकांनी साधली.
चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील पकडीगुडम धरण ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लो होताच गावातील व परिसरातील नागरिकांनी चढणीचे मासे पकडण्यासाठी सांडव्यावर एकच गर्दी केली. काहींनी तर अंगावरील धोतर सोडून त्याची जाळी केली आणि मासे पकडले. ज्यांना मासे मिळाले, त्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे दीड ते दोन क्विंटल मासोळी पाण्याचा प्रवाहात वाहून गेल्याचा अंदाज आहेत. एकीकडे पावसाने आणि पुराने जनजीवन विस्कळीत आहे, तर दुसरीकडे त्याच अतिवृष्टीचा फायदा घेतला जात असल्याची विसंगती यानिमित्ताने बघायला मिळाली. सध्या या सामूहिक मासेमारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत