पुराच्या अंधारात विसरली वाट, राहुल पावडेंनी दिली साथ #chandrapur

Bhairav Diwase
0

चंद्रपूर:- मागील सहा ते सात दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात संततधार पावसाने हाहाकार माजवला आहे शहरतच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक शहर वाड्या वस्ती या जलमय झाल्याने विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट.. मदतीला हाक द्यावी तरी कुणाला ..अशात रात्रीच्या भयान शांततेत त्यांच्याच मोबाईलवर पूर पिडितांन कडून सहायता मागितली जाते राहुल पावडे त्याच तत्परतेने पूर पिडिताच्या मदतीला धावून जातात पूरग्रस्तांची यातना वेदना यानिमित्ताने पुन्हा एकदा चंद्रपुरात समोर आली आहे.
पावडेनी लगेच मनपा प्रशासनाला सूचना दिल्या व ते स्वतः घटनास्थळी दाखल झाले रहमत नगर सिस्टर कॉलनी स्वावलंबी नगर आदी परिसरातील पूरग्रस्त नागरिकांना बोटीद्वारे स्थलांतरित करण्यात आले वेळेवर धावून आलेल्या राहुल पावडे यांचे देखील पूरग्रस्त नागरिकांनी यावेळी आभार मानले 2013 मध्ये देखील याहीपेक्षा पुराने नागरिकांचे सर्वस्व हिरावून घेतले होते.
यावेळेस देखील राहुल पावडे पूरग्रस्तांच्या पाठीशी देवदूत म्हणून उभे राहिले होते लोकनेते लोकलेखा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार हे या पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून असून प्रशासकीय यंत्रणा निर्देश दिले यावेळी देखील कुणाला मदत लागल्यास हक्काने आवाज द्यावा कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती राहुल पावडे यांनी केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)