Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

द्रौपदी मुर्मूंच्या विजयासाठी केली पूजा व अर्चना कार्यक्रम #chandrapur


अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून ताडपञीचे वाटप

माजी नगरसेवक इं. सुभाष कासनगोट्टुवार यांचा पुढाकार

चंद्रपूर:- शहरातील गोंड मोहल्ला येथे गोटुळ मध्ये भाजपाचे राष्ट्रपती उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विजयासाठी पूजा व अर्चना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


तसेच वैद्य नगर व गोंड मोहल्ला येथील अतिवृष्टीमुळे घरे पडली असतांना माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आ.सुधीर मुनगंटीवार यांचेमार्फत ताडपञी व धान्याची कीट उपलब्ध करुन दिली.यावेळी नागरिकांनी त्यांचे शब्दशारुपे आभार मानले.
या दोन्ही कार्यक्रमाप्रसंगी सुभाष कासनगोट्टुवार, धनराज कोेवे, माया मांदाडे, पुरुषोत्तम सहारे, वसंतराव धंदरे, बबनराव अनमोलवार, अरविंद मडावी, सीमा मडावी, इंद्र तुमराम, गीता मडावी, अनिता पुसम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत