Top News

छोट्याशा शहरातील फॅशन डिझायनर ममता सत्यनारायण शर्मा हिचा गडचांदूर ते लंडन प्रवास #gadchandur

छोट्याश्या भागाची मुलगी असून सुद्धा जिद्दीने तिला लंडनमध्ये स्थान मिळाले आहे

 मुलीसुद्धा अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवू शकतात त्याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमची ममता शर्मा

(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
गडचांदूर :- फॅशनच्या झगमगती दुनिया डोळे दिपवणारी एक जादूमयी सृष्टी असते, पण या सुंदर, नेत्रदीपक आविष्कारामागे व झगमगाटामागे असते अपार मेहनत, कष्ट, चिकाटी आणि अशक्य वाटणार्‍या कल्पनांना वास्तवात आणण्याचे कसब.
आपल्या स्वप्नांना व्यवहाराची जोड देत जवळपास गेली अनेक वर्षे फॅशन डिझायनरचे काम करणार्‍या छोटयाशा गडचांदूर शहरातील ममता सत्यनारायण शर्मा हिने डिझायनींग केलेल्या ड्रेसची नागपूर IIDS काॅलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील फॅशन रणवेय 2022 कार्यक्रम दिनांक 02 जुलै 2022 रोजी नागपूर येथे चिनविस सेंटर मध्ये आयोजीत केला होता.त्यामध्ये प्रामुख्याने उपस्थिती मध्ये दिग्दर्शक श्रीमंत झोया अफरोझ(Miss India International), राजनकुमार (celebrity fashion designer),इतर मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये ममता ने स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवीला. त्यांनी केलेल्या डिझायनींगची भुरळ प्रेक्षकांना व निरीक्षकांना भावली. ममता शर्मा यांनी डिझायन केलेल्या ड्रेसची चक्क लंडन फॅशन विक साठी निरीक्षकांनी निवड केली.
यामध्ये IIDS नागपूर या कॉलेज नी व त्या कॉलेज चे संचालक श्री. प्रशांत पंचलवार यांनी ममता ला लंडन फॅशन विक 2022 साठी लंडनमध्ये इटरशीप साठी संधी दिली आहे.या संधी मुळे तिला लंडनमध्ये निःशुल्क प्रशिक्षण व इटरशीप मिळेल.
ममता शर्मा यांनी घेतलेले उदंड कष्ट, जिद्द, मेहनत आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची त्यांची आकांक्षा कामी आल्याची चर्चा असून, तिचे फॅशन डिझायनरचे सर्वञ कौतूक होत आहे. शिवाय छोट्याश्या गडचादूर शहराचे नांवही रोशन झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने