Top News

बळीराजा हवालदिल....! शेतातील खत वाचविण्यासाठी उतरला पुरात #chandrapur #gondpipari #flood


शेती पाण्याखाली; खत वाचविण्याची बळीराजाची धडपड; शेतातील खत डोग्यांने सूरक्षितस्थळी हलविले
चंद्रपूर:- शेतात पाणी,घरात,वस्तीत पाणीच पाणी.या पावसाने बळीराचा डोळ्यातही पाणी आनलं. जिथे माणस पुरापासून स्वताचा जिव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. तिथे हा बळीराजा शेतातील खत सूरक्षितस्थळी हलविण्यासाठी पुरात उतरला आहे. या पुरामुळे बळीराजाची स्थिती हवालदिल झाली आहे. गोंडपिपरी तालुक्यातील अडेगावातील हा विडीओ पुराने खचलेल्या बळीराजाची बिकट स्थिती दर्शविणारा आहे.


पुराचा पाण्याचा सर्वाधिक फटका शेतीला बसला. मोठ्या कष्टाने उभी केलेली शेती पाण्याखाली गेली. पुर वाढतच आहे त्यामुळं उर्वरीत शेती पाण्याखाली वाढण्याचा धोका वाढला आहे. शेतपिकांना खत टाकण्यासाठी खत आदीच शेतात नेल्या गेलं होतं.
पुर वाढत असल्याने खत पाण्याखाली जाण्याचा धोका वाढला होता.अश्यात डोग्यांने पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत वाचविण्यासाठी धडपड करीत आहे. पिके पाण्याखाली आहेत. कुजण्याचा धोका वाढला आहे. अश्यात दुबारपेरणी केल्यावर किमान त्यावेळी खत कामी येईल, ही आशा बळीराजाला आहे.त्यामूळं जिवघेण्या पुरातून मार्ग काढीत बळीराजा खत सूरक्षितस्थळी हलवित आहे. मात्र हा प्रवास जिवघेना ठरणारा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने