Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

वरूर ते विरूर स्टेशन मार्ग खड्डेमय.... #Rajura #virurstation


रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता; नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
राजुरा:- राजुरा तालुक्यातील वरुर मार्ग टेंबुरवाही, सिर्सी. भेंडारा. खांबडा विरूर स्टेशन हा एक पदरी रस्ता आहे. आणि या मार्ग वरती अनेक ग्रामीण भागातील नागरिकांचे ये-जा चालू असते आणि या मार्ग वरती प्रत्येक रोड वरती गड्डे झाले आहेत.
मागील काही महिन्यापूर्वी रोड वरती खड्डे बुजविण्याचे काम केले असल्याची माहिती आहे. परंतू काही दिवसांतच रोड वरती पुन्हा खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेच कळत नसल्याने दुचाकी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे नाहक बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी लवकरात लवकर या रस्त्या दुरुस्त करावी अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत