ॲड. मोहन कलेगुरवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा.

Bhairav Diwase
0
म्हातारे आई-वडील डोक्यावरचं ओझं नसून आपली जबाबदारी व त्यांना सांभाळणे आपलं कर्तव्य- ॲड. मोहन कलेगुरवार


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
राजुरा:- दि. 15 ऑगस्ट रोजी भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष ॲड. मोहन कलेगुरवार यांच्या वाढदिवसानिमित्त् विसापूर येथील मोतोश्री वृद्धाश्रम येथे धान्यांचे किट व अल्पोआहार  भेट देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
    ॲड. मोहन कलेगुरवार दरवर्षीच आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा करतात. ज्यामध्ये वृक्षारोपण, अनाथ आश्रम येथील मुलांना शालेय वस्तू भेट देणे, रुग्णालय येथे फळ वाटप करणे, रक्तदान शिबीर, कोरोना योद्धांचा सत्कार करणे, अश्या अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच घेत असतात. आजच्या मंदावलेल्या आर्थिक परिस्थितीत विसापूर जवळील मातोश्री वृद्धाश्रमाला मदत करण्याची गरज असल्याची बाब कलेगुरवार यांच्या लक्षात आली.
     जर प्रत्येक तरुण व्यक्तीने आपले वृद्ध म्हातारे आई वडील आपल्या डोक्यावरचं ओझं नसून आपली जबाबदारी व त्यांना सांभाळणे आपलं कर्तव्य आहे असा दृष्टिकोन ठेवून आपल्या आईवडिलांची  म्हातारपणामध्ये काळजी घेतली पाहिजे जेणेकरून वृद्धाश्रमाची गरज भासणार नाही. असे प्रतिपादन ॲड. मोहन कलेगुरवार यांनी केले.


   त्याप्रसंगी ॲड. पुंडलिक देवतळे, ॲड. नंदकिशोर राऊत, ॲड. तृप्ती मांडवगडे, ॲड. प्रगती कांबळे, ॲड. राहुल थोरात, ॲड. सुधिर अरकीलवार, हरीश ब्राम्हणे, अजयकुमार श्रीकोंडा, सुनील अरकीलवार लोकेश पारखी, राज कलेगुरवार, प्रणव वैद्य, वैभव वनकर, छबिलाल नाईक, राहुल जगत व मित्र परिवार उपस्थित होते. उवक्रमदरम्यान अनेकांनी आपले मत मांडले व उपक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)