विद्यार्थ्यांनी घेतली निसर्ग रक्षणाची शपथ #chandrapurचंद्रपूर:- युवकांनी आपल्या अवत-भवतीचे निसर्ग, वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे येणारी पीढ़ी या कार्यात सक्रिय असली पाहिजे असा संदेश देत गुरुवारी वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन विद्यार्थ्यांनी निसर्ग रक्षणाची शपथ घेतली.
यावेळी शहरातील विविध महाविद्यालयाने सहभाग नोंदविला. दरम्यान या वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमातुन पर्यावरण रक्षणासाठी लढण्याची प्रेरणा विद्यार्थांना मिळाली.

लोहारा-मामला वनक्षेत्रातील "अदानी गो बॅक" आंदोलनाचे प्रतिक वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही एकत्रीत येत इको-प्रो तर्फे साजरा करण्यात आला.

यावेळी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक डॉ जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (बफर) जी. गुरुप्रसाद, सरदार पटेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, किशोर जामदार, ॲड. वर्षा जामदार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे, डॉ. बारसागडे, डॉ. कुलदीप गोंड, प्रा संतोष कावरे व विविध महविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक, इको-प्रो पर्यावरण विभाग प्रमुख नितीन रामटेके, संदीप जीवने विविध महाविदयालयाचे प्राध्यापक व विद्यार्थी- विदयार्थीनी व वनकर्मचारी उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन 'वाघांचा जिल्हा' ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपेदसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. याच खनिजामुळे या जिल्हयात औदयोगिक विकास सुध्दा झालेला आहे. या जंगलाच्या जमिनीखाली असलेल्या कोळशामुळे येथे मोठया प्रमाणात कोळसा खाण प्रकल्प, कोळसा आधारित विदयुत प्रकल्प निर्माण करण्यात आले आहे.

जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खाण प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. पण प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा म्हणुन येथील वन-वन्यजीवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी सदैव तत्पर राहीले पाहीजे असा सूर यावेळी मान्यवरांच्या बोलण्यातून उमटला. या कार्यक्रमादरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील 'अदाणी गो बॅक' आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. या कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालय, एफईएस महाविद्यालय, डॉ खत्री महाविद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, संभाजी राजे प्रशासकीय महाविद्यालय व इको-प्रो चंद्रपूर व भद्रावती सदस्य सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत