Top News

अमली पदार्थ, अँटी रॅगिंग व वाहतुकीचे नियम या विषयावर मार्गदर्शन #chandrapur #gondpipari



गोंडपिपरी:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे दिनांक 12/08/2022 ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रसंगी घर घर तिरंगा या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, ग्रंथालय विभाग आणि विधी सेवा समिती, गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने अमली पदार्थ, अँटी रॅगिंग व वाहतुकीचे नियम या विषयावर ॲड. कांबळे, ॲड. काळे, श्री. जीवन राजगुरू, ठाणेदार तथा मा. न्यायाधीश श्री. लंबे सर यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन करून ग्राथालय विभागातर्फे डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती निमित्य वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली तसेच रांगोळी स्पर्धा व निबंध स्पर्धेत विध्यार्थ्यानी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण,रा.से.यो कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार, डॉ. तिवारी सर, विध्यार्थी विकास योजनेचे समन्वयक प्रा. शरद लखेकर, ग्रंथालय विभाग प्रमुख प्राध्यापिका कु नलिनी जोशी,प्रा. संजय कुमार, प्रा. संजय सिंग, प्रा. जगदीश गभने आणि इतर शिक्षक, विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.प्रा. शरद लखेकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने