आजादी का अमृत महोत्सव निमित्त गोंडपिपरी शहरात भव्य रॅलीचे आयोजन #chandrapur #gondpipari

Bhairav Diwase
1 minute read
गोंडपिपरी:- श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी द्वारा संचालित चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस् अँड सायंन्स गोंडपिपरी येथे दिनांक ११/०८/२०२२ ला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी या प्रसंगी घर घर तिरंगा अंतर्गत रासेयो तथा विद्यार्थी विकास विभाग आणि पोलीस स्टेशन, तहसील कार्यालय गोंडपिपरी यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली चे आयोजन करण्यात आले.
"हर घर तिरंगा,घर घर तिरंगा." या कार्यक्रमाची उद्देश पुरती साठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयातून मिरवणूक काढण्यात आली आणि तहसील कार्यालयात पोहचली. तिथुन पोलीस कर्मचारी, नगर पंचायात कर्मचारी यांच्यासोबत शहराच्या मुख्य मार्गाने मिरवणूक शिवाजी चौक मार्गे पोलीस स्टेशन गोंडपिपरी येथे पोहोचली. त्याठिकाणी गोंडपिपरी चे ठाणेदार मान. जीवन. राजगुरू साहेब आणि तहसीलदार मान. मेश्राम साहेब मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयांचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण,रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. महेंद्र डी. अक्कलवार, प्रा. अविनाश चकिनारपूवार, प्रा. उमेश वरघणे डॉ. तिवारी सर, विध्यार्थी विकास योजनेचे समन्वयक प्रा. शरद लखेकर आणि इतर शिक्षक, विध्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.