Top News

तिरंगा ध्वज केवळ कापडाचा चौकोनी तुकडा नसून आमचा स्वाभिमान:- आ. सुधीर मुनगंटीवार #chandrapur

हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर:- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतुन राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज चंद्रपुरात त्यांच्या घरावर तिरंगा फडकवला. त्यानंतर बालकांसह हितगुज करत त्यांनी तिरंग्याच्या सन्मानार्थ घोषणा दिल्या.

हजारो लाखो शाहीदांच्या बलीदानातुन हा तिरंगा ध्वज आपल्याला लाभला आहे.हा केवळ कापडाचा चौकोनी तुकडा नसून आमचा स्वाभिमान आहे.या ध्वजात आम्ही महात्मा गांधी , हुतात्मा भगतसिंह , सुखदेव , राजगुरू, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सह असंख्य शुरवीरांना बघतो. शूरवीरांच्या बलीदानातुन मिळालेले हे स्वातंत्र्य आचंद्रसूर्य नांदोअसे श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने