१२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी केले स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण*
गोंडपिपरी:- आज दि.१५ आगष्ट २०२२ रोजी देश भरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला त्याचे औचित्य साधून गावातील १२ वी प्रथम क्रमांक साहील हरीचंद्रजी वाढई ७९.५०% मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले
विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी अभ्यासाची आवड निर्माण व्हावी यासाठी गावातील सक्रिय ग्राम पंचायत सदस्या सौ कोमल सुनिल फरकडे आणि प्रभाकरराव कोहपरे ग्रामपंचायत सदस्य चेक लिखितवाडा यांनी मासिक सभेमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे हा विषय मांडला व सर्वानुमते मंजूर करण्यात आला या उपक्रमाचे गावकऱ्यांनी व शिक्षक वर्गाने स्वागत केले.