कोरपना:- ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वितरण शिबिराचे आयोजन केले असून गडचांदुर कोरपना जिवती तालुक्यातील दिण्यांग बांधवांनी याचा लाभ घ्यावा. तसेच दीव्यांग रुग्णांनी आपल्याकडील खालील कागदपत्रांच्या मूळ व साक्षांकित 1 प्रत आणावी.
1.जुने दिव्यांग प्रमाणपत्र असल्यास
2.आधार कार्ड,
3.पासपोर्ट फोटो
4.मोबाइल फोन (वॉट्सअप)
5.आजारपणाचे कागदपत्र व रिपोर्ट्स (CT MRI व डिस्चार्ज कार्ड )घेवून नजीकच्या इंटरनेट केंद्रावर जावून UDID वर अपलोड करून स्वावलंबन कार्ड नोंदणी करावी व सदर कागदपत्र रुग्णालयात तपासणी वेळी आणावे जेणेकरून प्रमाणपत्र वितरण सोयीचे होईल. असे आव्हान ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ घटे यांनी केले.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत