Top News

गणपती विसर्जनाचा ट्रॅक्टर पलटी #chandrapur #chimur


1 महिला ठार, 27 जण जखमी, 6 महिला गंभीर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे विसर्जन झाल्यानंतर मिरवणूकीतील भक्तगण परत येत असताना ट्रॅक्टर पलटी होवून झालेल्या अपघातात 1 महिला ठार तर 27 जण जखमी, 6 महिला गंभीर झाल्याची घटना आज शनिवारी दूपारी बाराच्या सुमारास घडली. प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय 40)असे मृतक महिलेचे नाव आहे. या अपघातामध्ये शाळकरी मुलीसह अनेक महिला जखमी झाल्या असून 6 जणांची प्रकृती चिंताजणक आहे. त्यांना नागपूरला हलविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, चिमूर तालुक्यातील काजळसर येथील नवयुवक गणेश मंडळाने गणेशाची स्थापना दहा दिवस पूजाअर्चा करून आज शनिवारी (24 सप्टेंबर) निरोप दिला. वाजतगाजत मिरवणूक काढीत दूपारी बाराच्या सुमारास घोडाझरी शाल्यात गणेशाचे विसर्जन करण्यात आले. त्यानंतर भाविक भक्तगण घरी ट्रॅक्टरवर बसून घरी परत येत होते. यामध्ये शाळकरी मुलींसह महिलांचा समावेश होता.
जंगल नाक्याजवळील घोडाझरी नाल्याजवळ ट्रॅक्टर ट्रालीने पलटी घेतल्याने भीषण अपघात घडला. यामध्ये प्रेमीला गुलाब श्रीरामे (वय 45) या महिलेचा जागेच दबून मृत्यू झाला. तर 27 जण जखमी झाले त्यामध्ये 6 गंभीर जखमी आहेत.घरी परत येणा-या ट्रॅक्टर मध्ये शाळकरी मुलींसह महिला व विज पुरवठा करणारा जनरेटर ठेवण्यात आला होता. ट्रक्टर ला ब्रेक लावल्यामुळे जनरेटर व महिला एका बाजूला झाल्याने एकाच बाजूला वजन वाढले. ट्रक्टर ट्राॅलीने पलटी घेतली. अनेक जखमींना डोके,हात, पायाला मार लागला आहे. काहींचे हात, पाय तुटले आहे तर काहींना छातीला जबर मार लागला आहे.
या अपघाताची माहिती होताच काजळसर गावात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांनी घटनास्थळकडे धाव घेतली. या घटनेची माहिती पोलीस स्टेशनला देताच पोलीस घटनास्थळी येवून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविली. दोन रुग्णवाहिकांनी जखमींना चंद्रपूर, नागपूर, ब्रम्हपुरी रेफर करण्यात आले.
मृतकाच्या शवाचे पंचनामा करून उत्तरणीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले सदर ट्रॅक्टर उद्धव निकोडे यांच्या मालकीचे असून नरेश नावाचा व्यक्ती वाहन चालवित होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने