Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

कै. नीलकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालयात रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन #chandrapur #warora

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
वरोरा :- भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून श्री. रमेशराव राजूरकर उद्योगपती व समाजसेवक वरोरा हे उपस्थितीत होते.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित कै. निळकंठराव शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय वरोरा येथे रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून उद्योगपती व समाजसेवक रमेश राजूरकर वरोरा हे उपस्थित होते. रोजगार व स्वयंरोजगार कार्यरक्रमात मार्गदर्शन करतांना विद्यार्थ्यांनी सरकारी सेवेच्या मागे न लागता आपण उद्योगपती होऊन इतरांना नोकरी देणारे व्हावे असे मार्गदर्शन केले. प्राचार्य पियुष लांडगे यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला.
पाहूण्यांचा परिचय व प्रास्ताविक डॉ. प्रशांत पाठक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी खोंडे हिने केले. व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तृप्ती वाढई हिने केले. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे संचालक डॉ. कार्तिक शिंदे यांच्या प्रेरणेने घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रा. गुरुदेव जुमडे सर, प्रा.सीमा बोभाटे , प्रा.प्रणाली नरड, प्रा.प्रमोद पाठक, शकिल शेख, यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत