Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo



 

चंद्रपूर येथील सैनिकी शाळा बघून केंद्रीय मंत्री पुरी थक्क झाले, म्हणाले सुधीर मुनगंटीवारांचे काम लाजवाब #chandrapur #ballarpur

चंद्रपूर:- महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभर अनेक कामे केली. त्यामुळे चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघात येत्‍या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयी झेंडा पुन्‍हा एकदा फडकेल, असा विश्‍वास भारत सरकारचे पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी व्‍यक्‍त केला.
हरदीपसिंह पुरी सध्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. काल सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत त्यांनी चंद्रपुरची भव्य सैनिकी शाळा बघितली आणि थक्क झाले. त्यानंतर ते म्हणाले. सुधीर मुनगंटीवार म्हणजे लाजवाब… दरम्यान रामहित वर्मा या हमालाच्‍या घरी श्री. पुरी यांनी भोजनाचा आस्‍वाद घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्‍या ८ वर्षांत लोकहिताच्‍या विविध योजना राबविल्‍या. यात गरीब कल्‍याणाच्‍या योजनांवर त्‍यांनी विशेष भर दिला. तळागाळातील सामान्‍य माणसाच्‍या चेह-यावर आनंद फुलावा, शेतकरी समृद्ध व्‍हावा, यासाठी केंद्राने अनेक निर्णयदेखील घेतले असल्याचे ते म्हणाले.
बल्‍लारपूर येथे बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्राच्‍या संघटनात्‍मक बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना संबोधित करताना केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी बोलत होते. यावेळी राज्‍याचे वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, भाजपचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, हरीश शर्मा, वणीचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, राजेश बकाने, सुदर्शन निमकर, जैनुद्दीन जव्‍हेरी आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
हरदीपसिंह पुरी यांनी जिल्‍हा परिषद सदस्‍य, पंचायत समिती सदस्‍य, नगरसेवक, सरपंच यांच्‍याशी संवाद साधला. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्‍न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयांना त्‍यांनी माल्यार्पण करत अभिवादन केले. यादरम्‍यान तिलक वार्ड बल्‍लारपूर येथील रामहित वर्मा या हमाल काम करणा-या व्‍यक्‍तीच्‍या घरी पुरी यांनी भोजनाचा आस्‍वाद घेतला व त्‍यांच्‍याशी खेळीमेळीच्‍या वातावरणात संवाद साधला. यावेळी सुधीर मुनगंटीवार, हंसराज अहीर यांच्‍यासह प्रमुख पदाधिका-यांनीदेखील भोजन केले. वनमंत्री मुनगंटीवार यांनी रामहित वर्मा यांच्‍या कुटुंबीयांना कुकींग सेट भेट दिला. बल्‍लारपूर येथील खांडक्‍या बलाळशाह या गोंडराज्‍याच्‍या समाधिस्थळी भेट देऊन पुरी यांनी अभिवादन केले.
देशातील अत्‍याधुनिक अशा सैनिक शाळेला हरदीपसिंह पुरी यांनी भेट दिली व पाहणी केली. या सैनिक शाळेचे एकुणच स्‍वरूप भव्‍य व नेत्रदीपक असून देशाच्‍या संरक्षणाच्‍या प्रक्रियेत ही सैनिक शाळा मैलाचा दगड ठरणार असल्‍याचे प्रतिपादन पुरी यांनी केले. या सैनिक शाळेच्‍या निर्मितीसाठी पुढाकार घेतल्‍याबद्दल वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे त्‍यांनी कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत