चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिंपरी येथे शिक्षक दिन साजरा #chandrapur #gondpipari

गोंडपिपरी:- दरवर्षी भारतात प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्या अनुषंगाने चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट अँड सायन्स गोंडपिंपरी येथे कला व विज्ञान शाखेतील तृतीय वर्षाचे विद्यार्थी यांनी स्वयंशाशीत होऊन शिक्षक दिन उत्साहात साजरा केला.
तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी स्वतः शिक्षक बनून बीए व बीएससी च्या प्रथम व द्वितीय वर्गावर सर्व विषयाचे क्लास घेतले. व वरिष्ठ विद्यार्थ्यांच्या शिकवणीतून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक काढले. सर्व क्लास झाल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉ. आशिष चव्हाण हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संजय सिंग, प्रा. संजय कुमार, प्रा. अविनाश चकिनारपुवार हे होते. मा. प्राचार्य आणि इतर मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व प्राध्यापकांचे स्वयंशासित शिक्षकाद्वारे पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. स्वयंशाशीच शिक्षकाकडून शिक्षक दिनाविषयी मनोगत व्यक्त करण्यात आले.
सर्व शिक्षका विषयी आदर व सन्मान व्यक्त करण्यात आला. प्रमुख पाहुणे यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण व शिक्षणाचे महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
प्रभारी प्राचार्य डॉक्टर आशिष चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मयुरी व आभार कु. वैशाली धुडसे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या