Top News

वीज पडून एक शेतकरी ठार #saoli


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील गेवरा खुर्द येथे आज दुपारच्या सुमारास शेत शिवारात वीज पडून एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे. शरद पंढरी मुंघाटे वर्ष असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यात धान पिकातील निंदणाचे काम सुरू आहे. आज गेवरा खुर्द येथील मुंघाटे यांनी आपल्या शेतावर पत्नीसह दोन-तीन महिला निंदणाच्या कामाकरिता गेल्या होत्या. आज दुपारी दोन वाजताच्या दरम्यान सावली तालुक्यात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. दुपारी दोन वाजताच्या दरम्यान शरद मुंघाटे आपल्या शेतातील बांधावर बसले होते.
दरम्यान अचानक वीज कोसळल्याने शरद मुंघाटे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती गावात पसरतात गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली व
घटनेची माहिती पाथरी पोलीस स्टेशन व महसूल प्रशासनाला देण्यात आली विज पडून युवा शेतकरी मृत्यू झाल्याने गेवरा खुर्द गावात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने