Top News

कौतुकास्पद कामगिरी...! #Police #Korpana #Gadchandur #journalist


पत्रकारसंघातर्फे ठाणेदारांचा सत्कार
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजित आमले यांनी कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी केलेल्या नियोजनबद्ध व उत्तम कामगिरीची दखल घेऊन 'कोरपना तालुका ग्रामीण पत्रकार संघातर्फे' 12 सप्टेंबर रोजी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गडचांदूर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सुद्धा शब्द सुमनाने सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात उदभवलेल्या परिस्थितीत उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार आमले यांच्या नेतृत्वात येथील समस्त महिला व पुरुष पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीवाचे रान करून कर्तव्य बजावले.गेल्यावर्षी अमलनाला डॅम येथे तीन युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.ही बाब लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी ठाणेदार आमले यांनी जातीने लक्ष देऊन पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांसह डॅम परिसरातील प्रत्यक्ष पाहणी करून याठिकाणी पुर्वी झालेल्या त्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कसोशीने प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.
त्याचप्रमाणे यंदा वरुण राजाने कहर केला.याच पार्श्वभूमीवर गडचांदूर हद्दीतील धानोरा-भोयगाव पूल ओलांडून वाहू लागला होता.20 ते 25 वाहन चालक पुराच्या पाण्यात अडकले होते.त्यांना जिल्हा मदत टीमच्या सहाय्याने भरपावसात स्वतः त्यांना बोटीतून बाहेर काढले आणि पूर परिस्थिती संपेपर्यंत सतत याकडे लक्ष देऊन मदत कार्य केले.
कोरोना संकटात गेली दोनवर्ष शासनाने सर्व समाजाच्या सण,उत्सवावर निर्बंध घातले होते.यंदा मात्र निर्बंधमुक्त सर्व सण साजरे होत आहे.सध्याची परिस्थिती बघता सर्व धर्मिय सण,उत्सव अत्यंत शांततापूर्ण व मोकळ्या वातावरणात साजरे व्हावे यासाठी यांनी केलेले नियोजनाची सर्व धर्मिय समाज बांधव प्रशंसा करताना दिसत असून यंदाच्या गणेश आगमनापासून विसर्जन मिरवणूकी पर्यंत Gadchandur Police गडचांदूर पोलीसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक होत आहे.यासर्व बाबी लक्षात घेता यांच्या कामांची दखल घेऊन सत्कार करण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने